top of page
Search

पीसीओडी एक मोठी आरोग्य समस्या- सौ मंजिरी जोशी आहार तज्ञ, नाशिक

Updated: Jul 18, 2022

वय १८ ते २५ च्या दरम्यान, २ मासिक पाळीतील अंतर - साधारणपणे २ ते ४ महिने, वाढलेले वजन, चेहऱ्यावर दाढीचे केस, निरुत्साह, हट्टीपणा, लहरी स्वभाव.

हे चित्र आपल्याला खूप ओळखीचं वाटतंय ना ? असे किंवा अशा प्रकारचे थोडा फार फरक असलेले प्रश्न घेऊन अनेक मुली /स्त्रिया जगताहेत. आज या विषयीच आपण जाणून घेऊ. पीसीओडी ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे अंडाशय (ovaries) वेळेपूर्वीच अंडी सोडतात, जी कालांतराने सिस्ट मध्ये (cysts) रुपांतरीत होतात. जेव्हा असे होते तेव्हा महिलांना अनियमित मासिक पाळी (irregular periods ), वजन वाढणे, पुरुषांप्रमाणे केस गळणे आणि पोटदुखी सारख्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. या अवस्थेत अंडाशयाचा आकार वाढत जातो आणि शरीरात जास्त प्रमाणात पुरुषी हार्मो न्स (एंड्रोजेन) रिलीज होतात. पीसीओएस हा मात्र अंतःस्रावी प्रणालीचा ( एन्डोक्राईन ग्रंथीचा एक मेटाबॉलिक आजार आहे. या स्थितीत शरीरात मेल हार्मोन्स जास्त प्रमाणात रिलीज होऊ लागतात ज्यामुळे ओव्हुलेशनमध्ये अनियमितता येते. या मुळे अंडाशयामध्ये बरेच सिस्ट (छोट्या छोट्या आकाराच्या गाठी किंवा गळू ) तयार होतात. ही परिस्थिती पीसीओडीपेक्षा अधिक धोकादायक आणि गंभीर आहे. अशा परिस्थितीत वजन वेगाने वाढू लागते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज (PCOD ) या दोन्हीसाठी बरेचदा चुकीची जीवनशैली, जंक फूडचं अत्याधिक सेवन, आहारात अति कर्बोदके या सवयी जबाबदार असतात. त्यातही ज्या स्त्रियांना हा आजार असतो त्यांच्या मुलीला हा आजार होण्याचा संभव जास्त असतो.


साधारणपणे रिसर्च डेटा नुसार जगातील चार टक्के ते वीस टक्के स्त्रिया या आजाराने ग्रस्त आहेत. भारतासारख्या देशातही असेच चित्र आहे. शिवाय भारतात निदान न झालेल्या केसेसही भरपूर असणार.


या आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही. परंतु आटोक्यात मात्र ठेवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी मुलीच्या आरोग्याकडे जागरूकतेने बघणे, PCOD आणि PCOS ला समजून घेणे, योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून निदान करून घेणे आणि उपचारासोबतच मुलीचे


कौन्सेलिंग, आहारसल्ला, व्यायाम हे देखील करून घेणे गरजेचे आहे. या आपल्या आजारात खालील बाबींचाही समावेश होण्याची दाट शक्यता असते असते


१. इन्शुलिन रेझिस्टन्स २. हायपोथायरॉईडीझम ३. शरीरात ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल याचे प्रमाण वाढणे ४. पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे ५. दाढी आणि मिशी येणे ६. चेह-यावर आणि पाठीवर मुरूम फोड येणे या सर्व कारणांमुळे मुलीना नैराश्य तर गेनेन न भविष्यात आई होण्यातही बाधा येऊ श 17/28


तपासणी - ( सदर तपासणी डॉक्टर आहारतज्ञाच्या सल्ल्याने गरज असल्यासच करावी) १. PCOD हार्मोन प्रोफाइल (testosteron, SHBG, Prolactin, -MH, LH). HOM--IR. Lipid Profile ४. Thyroid profile ५ Liver profile (खूप लठ्ठपणा असल्यास ) ६. सोनोग्राफी


उपाययोजना-

१. योग्य औषधउपचार २. हाय प्रोटीन, लो कार्ब डायट. आणि भरपूर फायबर आणि एंटीऑक्सीडेंटस चा समावेश ३. योग्य असे व्यायाम ४. न्यूट्रास्यूटिकल्स (फूड सप्लिमेंट) या आजारासाठी न्यूट्रास्यूटिकल्स द्वारे उपचार केल्याने बराच फायदा दिसून येतो. काय आहे हे न्यूट्रास्यूटिकल्स ?



आपल्या अन्नात आणि आहारात असे काही सूक्ष्म घटक ( अर्क) असतात जे आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम करतात व ज्याचा उपयोग रोग बरा करण्यासाठी होऊ शकतो असे घटक वेगळे काढून ते उपचारासाठी वापरले जातात. याची सुरुवात आणि बरेच संशोधन सगळ्यात आधी जपान आणि अमेरिकेत झाले. भारतात असे अनेक घटक आज वापरले जातात. उदा. सर्दी पडसे झाल्यावर आपण हळद दुध पितो. हि फार पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. या या हळदीत कर्युमिन नावाचा एक घटक असतो जो शरीरासाठी फायदेशीर आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार हे कर्युमिन आता वेगळे काढले जाते आणि त्याच्या कप्सुल्सकेल्या जातात.


दुसरे उदाहरण - हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण खावा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण लसणामध्ये ऍलिसीन नावाचा एक घटक असतो जो हृदयासाठी उपकारक आहे. परंतु ठराविक प्रमाणात ऍलिसीन मिळवण्यासाठी आपल्याला वाटीभर लसूण खावा लागेल परंतु नवीन तंत्रज्ञान वापरून हे ऍलिसीन वेगळे केले जाते आणि तेगोळी च्या रूपात मिळते.


अशाच प्रकारे आयुर्वे द आणि आहार याचे एकत्रीकरण करून एक्स्ट्रॅक्ट प्रणालीने अर्क) तयार झालेले घटक यात वापरता येतात. अश्वगंधा अर्क पावडर, शतावरी अर्क पावडर, निर्गुडी अर्क पावडर, आवळा अर्क पावडर, लसून अर्क, कडीपत्ता अर्क, अशा प्रकारे आता अर्क पावडर उपलब्ध असतात. याचा फायदा हा आहे कि याने औषध कमी प्रमाणात घ्यावे लागते आणि फायदा जास्त होतो. कुठला अर्क पचवण्यासाठी कुठल्या दुसर्या अर्काची साथ लागेल यावरही आता भरपूर संशोधन झालेले आहे. उदा. हळदीतील कर्युमिन आणि मि-यातील पायपरीन हे एकत्र घेतल्यास जास्त चांगला परिणाम होतो अशा प्रकारे योग्य सल्ला व मार्गदर्शनाने या समस्येवर मात करता येऊ शकेल.

 
 
 

Comments


bottom of page