अहारातील मिलेट्सचे महत्व
- Manjiri Joshi
- Feb 8, 2023
- 2 min read
वर्ष 2023 हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे कारण संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष “भरडधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. “आंतरराष्ट्रीय योग दिना” नंतर हि भारतासाठी एक मोठी उपलब्धी आहे असे मला वाटते.
आज १० जानेवारी “Dietetics Day’ या वर्षीची थीम देखील या वरील उपलब्धीला धरूनच आहे.
Mighty Millets & 3As (Availability, Accessibility & Affordability) for sustainable development.
भारत हा जगातील सगळ्यात जास्त भरड धान्याची शेती असलेला देश आहे. जवळ जवळ १० मिलियन टन एवढे मिलेटस चे उत्पादन आजमितीस भारतात होते आणि हे प्रमाण वाढवणे सहज शक्य आहे.
या प्रकारातील पिकांना कमी पाणी आणि उच्च तापमान या दोन्ही भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहेत. त्यामुळे भारतातील शेती उद्योग देखील भरभराटीस येऊ शकतो, जनतेचे स्वास्थ्य देखील चांगले राहू शकते आणि सदर धान्याची इतर उत्पादने हा एक मोठा आयाम देखील आहेच.
काय आहेत हि भरड धान्ये –
‘भरडधान्ये’ म्हणजे ‘Millets’ अर्थात बारीक प्रकारची धान्ये. यांना ‘Nutricereals’ किंवा “Dryland cereals’ असेही म्हणतात. Cereals and Millets या ‘कर्बोदक’ देणा-या (शरीराला उर्जा देणा-या ) गटात भरड धान्यांचा समावेश आहे. National institute of Nutrition आणि ICMR या संस्थांनी अभ्यास करून यांची मुलतत्वे उपलब्ध करून दिलेली आहेत. Indian Institute of Millet Research (IIMR) हि संस्था मिलेट रिसर्च वर सध्या काम करत आहे. आणि भरड धान्याविषयी अधिकृत माहिती या संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
https://www.mygov.in/campaigns/millets/ या सरकारी पोर्टल वर याविषयीची अधिक माहिती उपलब्ध आहे.
1. बाजरी – Pearl Millet
2. ज्वारी Sorghum
3. नागली Finger Millet
4. राळ Foxtail Millet
5. भगर Barnyard Millet
6. कुटकी किंवा सामा Little Millet
7. चेना Proso Millet
8. कोदरा - Kodo Millet
फायदे –
1. देशातील शेतीसाठी उत्तम पर्याय
2. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतही शेती व्यवसायाला वरदान ठरू शकेल
3. लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे यातील काही millets मधुमेहींसाठी उपयुक्त आहेत
4. यातील कर्बोदके हि कॉम्प्लेक्स कर्बोदके आहेत ज्यामुळे कमी खाल्ले तरी जास्त वेळ पोट भरलेले राहते.
5. या धान्यात अजिबात ग्लुटेन नाही त्यामुळे Gluten Intolerance हा आजार असणा-या लोकांसाठी उत्तम पर्याय. तसेच थायरॉइड आजारांमध्ये “ग्लुटेन फ्री” आहारामुळे होणारे फायदे यावरदेखील संशोधन झाले आहे.
6. तंतुमय पदार्थ आणि मिनरल्स चा योग्य मेळ असणारी धान्ये
7. चांगल्या प्रतीचे प्रथिने असलेला स्त्रोत
8. वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय
9. हि धान्ये शिजण्यासाठी भरपूर पाणी लागते त्यामुळे कमी प्रमाणात धान्य खावूनही पोट भरल्याची भावना तयार होते
10. अनेक चविष्ट पदार्थ यापासून करता येतात
11. सध्या मिळत असलेल्या प्राधान्यामुळे millets चा वापर नुडल्स, रवा, लाडू मिक्स, चिप्स सदृश्य पदार्थ, चकली, फ्लेक्स (अर्थात पोहे प्रकार) अशा पदार्थांसाठी करता येतो. असे चविष्ट पर्याय सध्या बाजारात उपलब्ध देखील झाले आहेत. हा एका नवीन व्यवसायाच्या दृष्टीने लाभ आहे.
Millets खाताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे.- -
1. हि धान्ये शिजायला कठीण असतात त्यामुळे शक्यतो रात्रभर भाजत घालून, भरडून आणि जास्त वेळ शिजवल्यास फायदा होईल अन्यथा त्रास होऊ शकतो
2. भाकरी हा तर सोपा पदार्थ आहेच परंतु मिलेट खिचडी, मल्टीग्रेन आटा, आंबवून केलेल्या इडल्या, आंबोळी, खीशी अर्थात उक्कड, पेज या सर्व प्रकारात मिलेट चा वापर होऊ शकतो
3. अधिक तंतुमय पदार्थ असल्यामुळे, आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्तींनी आहारतज्ञाचा सल्ला घ्यावा
अशा या उपयुक्त आणि परंपरागत धान्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे सध्याच्या भौगोलिक बदलांमुळे आवश्यक आणि संयुक्तिक आहे. अगदी शासनाच्या मिड डे मिल साठी देखील याचा योग्य उपयोग करता येऊ शकेल. या विषयावर अजून काही संशोधन करण्यास देखील वाव आहे. जागतिक स्तरावर होणारे हवामान बदल आणि अन्न सुरक्षा यादृष्टीने ‘भरड धान्ये’ जगासाठी तारणहार ठरू शकतात.
नंतरच्या लेखात 3As (Availability, Accessibility & Affordability) for sustainable development यासंबधीचा विस्तृत विचार मांडणार आहे.
नक्की वाचा.
Commenti